‘एअर इंडिया’च्या खरेदी दस्तावर सरकारकडून स्वाक्षरी

‘एअर इंडिया’च्या खरेदी दस्तावर सरकारकडून स्वाक्षरी
चालू महिन्याच्या सुरुवातीला टाटा समूहातील टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एअर इंडियासाठी बोलीवर केंद्राने मंजुरी मोहोर उमटवली आहे
नवी दिल्ली : हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या १८,००० कोटी रुपयांच्या मोबदल्यात टाटा सन्सला विक्रीच्या ‘समभाग खरेदी दस्ता’वर सरकारकडून सोमवारी स्वाक्षरी करण्यात आली. चालू महिन्याच्या सुरुवातीला टाटा समूहातील टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एअर इंडियासाठी बोलीवर केंद्राने मंजुरी मोहोर उमटवली आहे. २,७०० कोटी रुपये रोखीत आणि एअर इंडियावरील कर्जदायित्वापैकी १५,३०० कोटी रुपये असा एकूण १८,००० कोटी रुपयांचा मोबदला मोजणाऱ्या बोलीला सरकारने देकार दिला. त्यानंतर ११ ऑक्टोबरला एअर इंडियाचा १०० टक्के हिस्सा सरकार टाटा समूहाला विकत असल्याचे इरादा पत्र जारी करण्यात आले. सोमवारी झालेल्या समभाग खरेदी दस्तावर एअर इंडियाचे संचालक (वित्त) विनोद हेजमाडी, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव सत्येंद्र मिश्रा आणि टाटा समूहाच्या वतीने सुप्रकाश मुखोपाध्याय यांनी स्वाक्षरी केली. डिसेंबरअखेरीस एअर इंडियाच्या टाटा समूहाकडे हस्तांतरणापूर्वी अनेक नियामक सोपस्कार पूर्ण करावे लागणार असून, भारतीय स्पर्धा आयोगाची (सीसीआय) मंजुरी मिळविणे आवश्यक ठरणार आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा