गणपतीपुळे जगडपर्यंतच्या किनारी भागात जेलीफिशचा वावर वाढल्यामुळे गिलनेटने मासेमारी करणार्यांच्या अडचणीत वाढ
गणपतीपुळे जगडपर्यंतच्या किनारी भागात जेलीफिशचा वावर वाढल्यामुळे गिलनेटने मासेमारी करणार्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जाळी फाटण्याच्या भीतीने अनेकांनी मासेमारी थांबवली आहे. खोल समुद्रात जाणार्या पर्ससीननेट मच्छिमारांची चंगळ झाली आहे. एका बोटीला ७५ हजार ते १ लाख १० हजाराची उष्टी बांगडी मिळत आहे.
जेलीफिशमुळे मिर्यासह आजुबाजूच्या छोट्या बंदरांमधील मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळले आहे. अनेकांच्या बोटी बंदरातच उभ्या आहेत. डिझेल दर वाढीमुळे गिलनेटवाल्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. सध्या डिझेल ११० रु. लिटर आहे. गिलनेटवाले जास्तीत जास्त दहा वावात जावून मासेमारी करतात. त्यांना एका फेरीला डिझेल ३५ ते ४० लिटर डिझेल लागते. इंदनासह अन्य मिळून २० हजार रुपये दिवसाला खर्च करावा लागतो. दिवसाचे उत्पन्न दहा हजार रुपये अशी स्थिती आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा