दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत-आमदार नितेश राणे यांची खाेचक टिका


 दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत-आमदार नितेश राणे यांची खाेचक टिका


दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. यामध्ये कोणतीही शंका उरलेली नाही, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता फरकच उरलेला नाही, हे मी आत्मविश्वासाने सांगतो, असे ट्विट नितेश यांनी केले. त्यामुळे आता शिवसेनेकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आज काहीजण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहत असतील. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणं, चिरकणं यातून त्यांना रोजगार मिळतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या