दापोलीत १० ऑक्टोबर २०२१ रोजी जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त सायकल फेरीचे आयोजन


 दापोलीत १० ऑक्टोबर २०२१ रोजी जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त सायकल फेरीचे आयोजन 


दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी विनामूल्य सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जागृती रुजवण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्यजीवांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी ही सायकल फेरी असेल. सायकल फेरी आझाद मैदान ध्वजस्तंभ येथून सकाळी ७:१५ वाजता सुरु होईल. सायकल फेरी मार्ग 

आझाद मैदान दापोली- केळस्कर नाका- बुरोंडी नाका- चंद्रनगर- नवभारत छात्रालय- वनविभाग ऑफिस- आझाद मैदान असा १० किमीचा असेल. समारोप आझाद मैदानात १० वाजता होईल. या सायकल फेरीमध्ये दापोली परिक्षेत्र वन अधिकारी श्री वैभव बोराटे सर व सहकारी, वनविभागाचे अधिकारी, प्राणीमित्र, पक्षीमित्र, सर्पमित्र इत्यादी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जंगलातील गमती जमती सांगणार आहेत. भारतासहित जगातील इतरही पुरातन संस्कृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहे, कारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही. 

सायकल फेरीसाठीच्या सूचना व नियम पुढीलप्रमाणे आहेत. सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. कोणतीही सायकल घेऊन येऊ शकता. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. सायकल फेरीमध्ये सायकल हळूहळू, रांगेत एकाच्या मागोमाग एक अशी चालवली जाते. No overtake. दर १ किमी नंतर थोडा वेळ थांबून कोणी पुढे-मागे होणार नाही याची काळजी घेतली जाते. सोबत काही पालक, स्वयंसेवक बाईक घेऊन असतात. मास्क आवश्यक. सायकल फेरी मार्गावर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तरीही प्रत्येकाने सोबत पाण्याची बाटली, थोडा खाऊ ठेवावा. पाऊस असल्यास सोबत रेनकोट ठेवावा. सायकल हेल्मेट, हातात सायकल ग्लोव्हस असलेले चांगले. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ९५४५१९८७१३ हे आहेत. 

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लब मार्फत विनामूल्यपणे अनेक सामाजिक उपक्रम, सायकल दुरुस्ती शिबीर, सायकल राईड, स्पर्धा, शर्यती, सायकल फेरी इत्यादींचे आयोजन केले जाते. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि इतरांनाही सायकल चालवायला प्रेरित करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सर्वानी सायकल चालवूया, प्रदूषण टाळूया, पर्यावरण जपुया, तंदुरुस्त राहूया, मानसिक ताणतणाव घालवूया, प्रतिकारशक्ती वाढवूया आणि रोगमुक्त होऊया असा संदेशही क्लबने दिला आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या