प्रेरणादायी पुस्तक : आयुष्य घडविण्याची सात प्रभावी सूत्रे.
सौ अश्विनी बिहाणी यांचे ' आयुष्य घडवणारी सात प्रभावी सूत्रे ' हे दुसरे पुस्तक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात जीवनातील ताणतणाव वाढले आहेत. आपले ध्येय साध्य करताना या ताणतणावांवर प्रभावीपणे कशी मात करावी, हे पुस्तकातून लेखिकेने सांगितले आहे. आपल्या आयुष्यातील समस्यांवर मात करताना कोणती काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. 'स्वत्वाचा शोध', ' वेळेचे नियोजन ', 'सकारात्मक दृष्टिकोन'. ' समस्यांचा सामना', ' उद्याची सोनेरी पहाट', ' वागणुकीचे मूलमंत्र ','सुखी जीवनाची गुरुकिल्ली' अशी सात प्रकरणे या पुस्तकात आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसे वागावे हे सांगितले आहे. जीवनातील नैराश्य दूर करण्यासाठी या पुस्तकातील माहिती निश्चितच उपयोगी ठरेल. पुस्तकाचे नाव : आयुष्य घडवण्याची सात प्रभावी सूत्रे. लेखिका : सौ. अश्विनी बिहाणी. प्रकाशक :साकेत प्रकाशन, पुणे. पृष्ठे :११९. मूल्य : शंभर रुपये.
- रवींद्र जांभळे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा