वाळू उत्खनन करणाऱ्या चार होडय़ा ताब्यात

वाळू उत्खनन करणाऱ्या चार होडय़ा ताब्यात
प्रशासनाने या कारवाईत चार होंडय़ासह २३ ब्रास वाळू, वाळू काढण्याचे साहित्य जप्त केले आहेत
सावंतवाडी : देवबाग येथिल कर्ली खाडीत बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या चार होडय़ा ग्रामस्थांनी पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिल्यानंतर मालवण पोलिसात बोट मालक तिघांसह ४८ कामगार अशा एकूण ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान प्रशासनाने या कारवाईत चार होंडय़ासह २३ ब्रास वाळू, वाळू काढण्याचे साहित्य जप्त केले आहेत . गेले काही महिने देवबाग येथील कर्ली खाडीत बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असून याबाबत देवबाग ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी मालवणच्या महसूल प्रशासनाकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. मात्र निवेदन देऊनही कर्ली खाडीत होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात कारवाई केली गेली नाही. त्यामुळे संतप्त बनलेल्या देवबाग वासीयांनी कर्ली खाडीत वाळू उत्खनन करणाऱ्या चार होडय़ा पकडल्या व त्या प्रशासनाच्या ताब्यात दिल्या . याबाबत मालवण मंडळ अधिकारी पीटर लोबो यांनी अनधिकृत वाळू उपसा व शासकीय मालमत्तेची चोरी प्रकरणी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली.त्यानंतर तिघांसह ४८ कामगार अशा एकूण ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामस्थांनी पकडलेल्या तिन्ही बोटी, साहित्य व कामगार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गतवर्षी देखील वाळू उत्खनन आणि लिलावाचा घोळ अखेर पर्यंत सुरूच राहिला यामुळे वाळूमाफियांचा फायदा झाला. यामध्ये महसूल आणि पोलिस डंपर अडवून दंडही करू लागले होते. यंदा तरी लवकरात लवकर वाळू लिलाव जाहीर करून लोकांना परवडेल अशी वाळू मिळावी . अशी जनतेची अपेक्षा आहे. येथील वाळूला गोवा आणि कर्नाटक राज्यात मागणी असल्यामुळे वाळूला मोठा भाव आहे. त्यामुळे चोरी चुपके वाळू तस्करी होत असल्याने यंत्रणेला हाताशी धरले जात आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment