सद्यस्थितीवर आधारित समाजप्रबोधनकारक मराठी लघुचित्रपट "काय केला मी गुन्हा" लवकरच युट्युब वाहिनीवर

सद्यस्थितीवर आधारित समाजप्रबोधनकारक मराठी लघुचित्रपट "काय केला मी गुन्हा" लवकरच युट्युब वाहिनीवर


कलेची आवड असेल तर कलेसाठी कोणी काहीही करू शकतो, याचं उदाहरण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते भेकरेवाडीतील सर्व सामान्य घराण्यातील तरूण सुबोध भेकरे यानी एक हौस म्हणून कोकणातील सामन्य कलाकार गोळा करून एक मराठी लघुचित्रपट बनविला आहे.काय केला मी गुन्हा  अस या चित्रपटाचं शीर्षक असून दस-याच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचा ट्रेलर SB _Creation युट्यूब चाईनलवर प्रदर्शित झाला आहे.

 या लघुचित्रपटाची निर्मिती मानसी भेकरे यांनी केलेली आहे. तसेच कथा लेखन दिग्दर्शन  सुबोध भेकरे यांनीच केलेले असून सहदिग्दर्शन अमित भेकरे यांनी केले आहे‌‌. या चित्रपटाचं छायाचित्रिकरण सागर शितप यांनी केले असून   आपण कलाकारांनी शांत न बसता लोकांसमोर आपली कला सादर करुया अशी संकल्पना  किरण शितप  आणि  हेमंत लाडगे यांनी मांडली. फिल्म साठी इंग्लिश सबटाईटल - गौरव बर्वे, प्रोडक्शन हेड- प्रमोद गोवळकर, सुशांत लोंढे, म्युझिक - संदिप पालेकर, रंगभुषा- संदेश पालकर, वेशभूषा - सचिन दसम यांची असून फिल्म साठी विशेष सहकार्य संदिप कानसे, सतिश घडशी, सुप्रिया घडशी  यांनी केले आहे‌. 

           या लघुचित्रपटाच्या मुख्य भुमिकेत चंद्रकांत घडशी ,श्रिया शितप, प्रणाली मांडवकर,  किरण शितप,  संध्या शितप, रोहन पाचकले,  संदेश पालकर , सागर शितप, प्रमोद गोवळकर, सुशांत लोंढे , सुदेश शितप , सुरज शितप, महेश दसम, सोनाली भेकरे, हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण संगमेश्वर तालुक्यातील माभले गावात गणपती मध्ये पुर्ण झालं आहे.  सद्यस्थितीवर  आधारित समाजप्रबोधनकारक संदेश या चित्रपटातून देण्यात आला असून लवकरच हा लघुपट Youtube वाहिनीवर प्रसारित होईल, तेव्हा प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल आणि तो नक्की पहावा अस आवाहन SB_ Creation टीमने केलं आहे.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments