कोंकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करणेबाबत आमदार डॉ.राजन साळवी यांची कृषीमंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे मागणी

 


कोंकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करणेबाबत आमदार डॉ.राजन साळवी यांची कृषीमंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे मागणी 


राजापूर/प्रतिनिधी दि.१२:

 कोंकणा मध्ये अवकाळी पाऊसामुळे मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात झालेले नुकसान पाहता कोंकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत आमदार डॉ.राजन साळवी यांनी कृषिमंत्री ना.दादा भुसे यांची भेट घेऊन चर्चा करून मागणी केली.

कोकणावर आजपर्यंत आलेल्या अनेक वादळांमुळे शेक-यांचे मोठयाप्रमाणात नुकासान झाले आहे. तसेच आजपर्यंत होत असलेल्या अतिवृष्टी,अवकाळी पाऊस यामुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठयाप्रमाणात नुकसान होत आहे. परंतु अवकाळी पाऊस व अतिवृष्टी मुळे आतपर्यंत शेतक-यांचे कापणीला आलेले पीक पावसामुळे  खराब झाले असुन  भातशेतीचे नुकसान झाले असल्यामुळे  शेतकरी संकटात सापडला असल्यामुळे कोंकणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती आमदार डॉ.राजन साळवी यांनी निवेदनाद्वारे केली.

त्या अनुषंगाने कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांनी संबंधित विभागातील सचिवांना उचित कार्यवाही करण्याचे आदेश देऊन निवेदानाप्रती सकारत्मता दर्शवली आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org