- डिझेलवर धावणाऱ्या १ हजार एसटी गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर-मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती


डिझेलवर धावणाऱ्या १ हजार  एसटी गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर-मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती

मुंबई – कोरोनामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाल्याने त्याचा उत्पन्नाला फटका बसला आहे. त्यातच डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या १७ हजार बसेस असून डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या ३४ टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किमतीमुळे तो आता ३८ ते ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोझा पडत असल्यामुळे महामंडळ दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत अडकले जात आहे. अशा परिस्थितीत महामंडळावरील आर्थिक बोझा कमी करण्यासाठी परिवहन मंत्री  तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब हे वेगवेगळया पर्यायांचा अवलंब करीत आहेत. जसे शासकीय व खाजगी मालवाहतूक, शासकीय वाहनांची देखभाल दुरुस्ती, खाजगी बसची बांधणी, खाजगी वाहनांचे टायर  पुन:स्तरीकरण इत्यादी. त्याच अनुषंगाने डिझेलवर होणाऱ्या कोट्यावधी रूपयांच्या खर्चाचा गांभीर्याने विचार करत डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यातील १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक निधीसाठी महामंडळाने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. रिट्रोफिटमेंटसाठी एकूण १४० कोटी रूपयांची मागणी महामंडळाने केली होती. महामंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २०२१-२०२२ च्या अंदाज पत्रकात या निधीची तरतूद केली आहे, असे ॲड. परब यांनी सांगितले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या