कुवारबांव येथे पंक्चर दुकानातील कामगारांनी मालकाचे ५० हजार रुपये लांबविले


कुवारबांव येथे पंक्चर दुकानातील कामगारांनी मालकाचे ५० हजार रुपये लांबविले


रत्नागिरी शहराजवळील कुवारबांव रविद्रनगर येथे पंक्चर दुकानात काम करणार्‍या दोन कामगारांनी मालकाचे ५० हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत फिर्यादी मोहमद आलम यांनी आरोपी १) मोहमद बशीर २) महमद गोरी यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

यातील फिर्यादी मोहमद आलम यांचे रहाटघर रत्नागिरी येथे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. त्या ठिकाणी मोहमद बशीर व महमद गोरी हे हेल्पर म्हणून काम पाहतात. फिर्यादी यांनी दोन महिन्याचा हप्ता चोला मंडल फायनान्स कंपनीमध्ये भरण्यासाठी करबुडे येथील दुकानातून ५० हजार रुये रविंद्रनगर, कुवारबांव येथे आणले होते. ते एका बॅगेत ठेवून बॅग खिळ्याला लावली होती. त्यावेळी आरोपी खोलीत जेवत होते. त्यानंतर फिर्यादी हे बाजारात आले होते. ते परत खोलीवर आले असता खोलीला कुलूप होते. त्यामुळे त्यांना शंका आल्याने त्यांनी कुलूप उघडून आत प्रवेश केला असता पैशाच्या बँगेसह आरोपी फरारी झाल्याचे दिसून आले म्हणून त्यांनी शहर पोलीस स्थानकात आरोपी विरूद्ध चोरीची तक्रार दाखल केली.     


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या