स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात मोफत कोव्हीशिल्ड लसीकरण झाले सुरू




 स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात मोफत कोव्हीशिल्ड लसीकरण झाले सुरू


ऑन स्पॉट बुकिंग


- स. रा. देसाई अध्यापक विद्यालयात मोफत कोविशिल्ड लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या ७ दिवसात येथे सुमारे 1978 एवढ्या लोकांनी लस घेतली आहे.

काही लाभार्थी ऑनलाईन बुकिंग करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्पॉट बुकिंगची सोय आहे. त्यामुळे येथे लसीकरण करण्यासाठी प्रतिसाद मिळत आहे. फार वेळ रांगेत उभे राहावे लागत नाही, अतिशय सुरेख नियोजन असल्यामुळे येथे लाभार्थी सुद्धा समाधानी आहेत. 1 ऑक्टोबर रोजी लसीकरण सुरू झाले. आजवर  1978 जणांनी लस घेतली आहे. 1 ऑक्टोबर पासून दररोज  341,487, 667, 154,187, 96 आणि 46 लोकांनी लस घेतली.

नजीकच्या गावात 200 जणांनी नोंदणी केल्यास त्यांना गावात येऊन मोफत लस दिली जाईल. त्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन माजी आमदार बाळ माने यांनी केले आहे

आज ज्यांना लस घ्यायची आहे त्यांनी तत्काळ देसाई अध्यापक विद्यालय, माळ नाका येथे संपर्क साधावा.

सिरम इन्स्टिट्यूट, पुणे आणि दि यश फाउंडेशन आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती द. रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी शहर आणि लगतच्या परिसरातील १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हीशिल्डची पहिली व दुसरी मात्रा दिली जात आहे.

९ ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या लसीकरणाकरिता ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून Appointment घ्यावी. Online Appointment घेण्याकरिता www.cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांनी दि यश फाउंडेशन, रत्नागिरी या केंद्राअंतर्गत Online Appointment घ्यावी.

नोंदणी करताना आपणास सशुल्क (Paid) दिसले तरी सर्व लसीसाठी किंवा सेवाशुल्क म्हणून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही. लसीकरण संपूर्णपणे मोफत आहे, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी केले आहे.

....................................

टिप्पण्या