गॅस सिलिंडर आणि बॅंकांचे बदलणार “हे’ नियम;
गॅस सिलिंडर आणि बॅंकांचे बदलणार “हे’ नियम
बॅंकांचे नियम –
ऑक्टोबरपासून क्रेडिट आणि डेबिट कार्ड पेमेंटशी संबंधितनियमांमध्ये बदल होणार आहे. तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डमधून ऑटो डेबिटचा नवीन नियम लागू झाला आहे. या अंतर्गत बॅंका ग्राहकांच्या माहितीशिवाय तुमच्या खात्यातून पैसे कापू शकणार नाहीत. बॅंक तुम्हाला यासाठी आगाऊ माहिती देईल आणि तुमच्या संमतीनंतर पेमेंट खात्यातून कापले जाईल.
ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स अर्थात ओबीसी बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बॅंकेची जुनी चेकबुक वैध राहणार नाहीत. या बॅंका इतर बॅंकांमध्ये विलीन झाल्या आहेत. यानंतर, खातेधारकांचा खाते क्रमांक, चेक बुक, आयएफएससी कोड बदलण्यात आला आहे.
ऑक्टोबरपूर्वीचे जुने चेकबुक वापरले जाऊ शकत नाही. एक ऑक्टोबरपासून डिजिटल लाइफ सर्टिफिकेटशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहे.
आता पेन्शनधारक ज्यांचे वय 80 वर्षे आणि त्याहून अधिक आहे ते देशातील सर्व प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या लाइफ सर्टिफिकेटमध्ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतील. सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे नियमही बदलले आहेत.
म्युच्युअल फंड हाउसमध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नवीन नियमानुसार मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन लागू होईल. एमएससी कंपन्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या 10 टक्के गुंतवणूक म्युच्युअल फंडांच्या युनिटमध्ये करावी लागेल.
एलपीजी गॅस सिलिंडरचे नियम
ऑक्टोबरपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही बदल होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जातात. गेल्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. ऑक्टोबर महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ होऊ शकते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment