राजापूरातील नाटे पोलिस ठाणे येथे मंदिर, मस्जिद, दर्गा विश्वस्तांची सभा संपन्न
राजापूरातील नाटे पोलिस ठाणे येथे मंदिर, मस्जिद, दर्गा विश्वस्तांची सभा संपन्न
रत्नागिरी प्रतिनिधी:-
सागरी पोलीस ठाणे नाटे येथे पोलीस ठाणे अंतर्गत मंदिर, मस्जिद, दर्गा विश्वस्तांची सभा संपन्न झाली. या सभेला मोठ्या संख्येने विश्वस्त ,मंदिरांचे पुजारी/गुरव, मौलाना उपस्थित होते. प्रारंभी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील यांनी पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या आदेशानुसार सदर सभा घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेषतः मंदिरामध्ये दानपेट्या चोरणे, फोडणे, मुर्तींची विटंबना करणे, मंदिरातील मुर्त्या अज्ञात स्थळी ठेवणे, त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण होणे, कायदा सुव्यवस्था बिघडणे इ.गोष्टी घडू नयेत म्हणून मंदिर, मस्जिद, दर्गा व्यवस्थापनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषतः मंदिर, मस्जिद येथे उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात यावेत, जेणेकरून किमान सहा महिने त्यातील डाटा संकलित राहील. मंदिर, मस्जिदमध्ये वाँचमन, स्वयंसेवक यांची नियुक्ती करणे, मंदिर, मस्जिद दरवाज्यांना सेंट्रल लाँकची व्यवस्था करणे, मौल्यवान वस्तूंसाठी लाँकरची व्यवस्था करणे, मंदिर, मस्जिद परिसरात भक्कम तटबंदी/दगडी भिंत असावी, उत्सव काळात भाविक महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून सीसीटीव्हींचे जाळे परिसरात बसविणे आदी सुविधा निर्माण करण्यासंदर्भात निर्देश दिले. या कामी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित अनेक विश्वस्त व पुजाऱ्यांनी विविध शंका व त्यावरील उपाय योजनांची माहिती करून घेतली. यावेळी गुप्त शाखेचे अंमलदार दीपक काळे उपस्थित होते. दर पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले व लवकरच आमच्या कार्यक्षेत्रातील लहान मोठ्या सर्व मंदिर, मस्जिद, दर्गा यांना भेटी देणार असल्याचे सांगितले. विश्वस्तांच्या वतीने श्री देव वेताळ मंदिर जैतापूरचे विश्वस्त दिवाकर आडविरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment