काळबादेवी गावाच्या सौंदर्यात आणखी एक मानाचा तुरा उभारली भव्य प्रवेशद्वार कमान,
काळबादेवी गावाच्या सौंदर्यात आणखी एक मानाचा तुरा उभारली भव्य प्रवेशद्वार कमान
श्री.विष्णु बिर्जे व पत्नी सौ. वैष्णवी बिर्जे यांनी दिले योगदान
काळबादेवी ग्रामस्थ विष्णु बिर्जे व पत्नी सौ. वैष्णवी बिर्जे यांनी स्वकष्टातून बांधलेली पाथरदेव येथील काळबादेवी गावाच्या प्रवेशद्वारावरील कमान आज विजयादशमीच्या मुहुर्तावर शेकडो ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये *भाटिमिऱ्या गावचे माजी सरपंच बावा नार्वेकर यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण केले व *श्री.विष्णु बिर्जे व पत्नी सौ. वैष्णवी बिर्जे ( शिंदे बाई ) यांनी लोकार्पण केले.
गावच्या सौंदर्यात भर घालणारी ही अप्रतिम कमान वास्तूकलेचा एक उत्तम नमुना आहे. पुढील काही पिढ्या विष्णु बिर्जे यांनी बांधलेली ही कमान आपली *आई सरस्वती बिर्जे व भाऊ कै. प्रेमानंद बिर्जे यांच्या स्मृतीची आठवण करून देतील. सामान्य आर्थिक परिस्थिती असताना त्यांनी हे दाखवलेले औदार्या गौरव करण्यासारखेच आहे, असे कौतुकास्पद उद्गार बावा नार्वेकर यांनी काढले.
काळबादेवी गावची दिशा ठरताना ही कमान जास्तीत जास्त पर्यटकांना निमंत्रित करेल, यात शंका नाही. रामेश्वर कालिका देवस्थानाचे भाविकांमध्ये भर पडले, असे उद्गार तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष शरद शेट्ये यांनी काढले.
शेकडो ग्रामस्थ व विष्णु बिर्जे यांचे मित्रमंडळ यांच्या उपस्थितीमध्ये आज हा लोकार्पणाचा सोहळा पार पडला. कुठलाही प्रसिद्धीचा ओघ नको व गावासाठी अल्प सहकार्य केले, अशी भावना असताना बिर्जे दांपत्याचा सत्कार बावा नार्वेकर आणि बापू गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रवेशद्वाराचे बांधकाम स्थानिक कामगारांनी केले.
देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश शेट्ये, बापु गवाणकर यांनी बिर्जे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. शेकडो ग्रामस्थ बंधुभगिनींच्या उपस्थितीत झालेल्या कार्य सुत्रसंचालन निमंत्रक संजय वारेकर यांनी केले. या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. श्री.बावा नार्वेकर,संजय वारेकर,मनोहर बिर्जे,वामन शेटये,अशोक बिर्जे,बापू ( प्रसाद ) गवाणकर,प्रकाश शेट्ये,गजानन जोशी,मंगेश मयेकर,विलास चौगुले,ग्रामपंचायत सदस्य समिर शेट्ये,ओंकार कांगुटकर( गोटया) श्री.शरद शेट्ये ,संजय मयेकर,मिहिर फोटो क्लिक संजय केशव मयेकर आणि मान्यवर महिला वर्ग उपस्थित होता
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा