उपाहारगृहे रात्री ११ पर्यंत

उपाहारगृहे रात्री ११ पर्यंत
खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा; सोमवारपासून अंमलबजावणी
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील खासगी कार्यालये १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच शहरासह जिल्ह्य़ातील उपाहारगृहे रात्री ११ वाजेपर्यंत आणि पर्यटन स्थळे खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या निर्णयांची अंमलबजावणी सोमवारपासून (११ ऑक्टोबर) करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांनी आदेश प्रसृत के ले आहेत.
करोना सद्य:स्थिती आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. याबाबत माहिती देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने शासकीय कार्यालयांप्रमाणे खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास
मुभा देण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. तसेच शहरासह जिल्ह्य़ातील उपाहारगृहे रात्री ११ वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळे उघडण्यात येणार आहेत. या निर्णयांची अंमलबजावणी सोमवारपासून के ली जाणार आहे.’
दरम्यान, सध्या पुण्याचा बाधित दर २.५ टक्के , पिंपरी-चिंचवडचा २.३ टक्के , तर ग्रामीण भागाचा ३.६ टक्के असून पुणे जिल्ह्य़ाचा बाधित दर तीन टक्के एवढा आहे. शहरासह जिल्ह्य़ात एक कोटी नऊ लाख जणांना पहिली किं वा दुसरी मात्रा देण्यात आली आहे. त्यामध्ये ८८ टक्के जणांनी पहिली, तर ४९ टक्के जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. पहिल्या मात्रेनंतर ०.२० टक्के , तर दुसरी मात्रा घेतल्यानंतर बाधित होणाऱ्यांचे प्रमाण ०.७५ टक्के आहे, असेही पवार यांनी सांगितले.
झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन लसीकरण
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांचे लसीकरण कमी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करावी, असेही आदेश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा