दहिसर, मुंबई येथील आनंद नगर मनपा शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा
दहिसर, मुंबई येथील आनंद नगर मनपा शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा संगीता जांभळे,नाशिक रोड.
१४ ऑक्टोबर वैश्विक विद्यार्थी दिन व भारताचे माजी राष्ट्रपती स्व.डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस आनंद नगर मनपा इंग्रजी शाळेत साजरा करण्यात आला. समारंभाचे उद् घाटन विद्यमान नगरसेवक जगदीश ओझा, बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण आर उत्तर प्रशासकीय अधिकारी श्रीमती शोभा वाडियार, भाजप युवती अध्यक्ष पल्लवी नाईक, तुळशीदास जगताप यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून झाले. प्रमुख पाहुणे नगरसेवक जगदीश ओझा यांनी 'वाचाल तर वाचाल' असे सांगून वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. सर्व प्रथम मिसाईलमॅन थोर संशोधक माजी राष्ट्रपती स्व.डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या आणि सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगर पालिका आनंद नगर शाळेच्या मुख्याध्यापिका जागृती वडे यांनी पाहुण्याचे स्वागत केले. सुजल पिपंळे, स्नेहल गांगण, रागिनी नायक या शिक्षकांनी व शिपाई विनायक बावकर, योगिता मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. जेष्ठ दंतचिकित्सक डॉक्टर श्वेता वर्मा यांच्या मदतीने शालेय विद्यार्थ्यांचे विनामूल्य दंत आरोग्य शिबिर पार पडले. तुळशीदास जगताप यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वितरण करण्यात आले. गुलाब पुष्प देऊन वाचन प्रेरणा दिवस आणि विद्यार्थी दिवस आनंदात साजरा करण्यात आला.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा