चिपळूणमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; नदीच्या पाणी पातळी वाढ झाल्याने पूरस्थिती


  • chiplun flood

  • चिपळूणमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; नदीच्या पाणी पातळी वाढ झाल्याने पूरस्थिती


  • कोकणालाही पावसाने झोडपून काढलं
  • चिपळूण ढगफुटी सदृश्य पाऊस
  • नदीला पुन्हा पूर येण्याची भीती.

 चिपळूण रत्नागिरी: राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहेत. कोकणालाही पावसाने झोडपून काढलं असून  तालुक्यात शिरगाव व पोफळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे शिरगावच्या वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शिरगाव पोफळी परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. घाटातील डोंगर-दऱ्यांत मुसळधार पाऊस पडल्यामुळे शिरगावच्या वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि काही क्षणात पूरपरिस्थिती निर्माण झाली.

नदीने रूद्र रूप धारण केल्याने तात्काळ शिरगाव पोलीस प्रशासनाने दखल घेत नदीच्या पुलावरील वाहतूक बंद केली.

दुसरीकडे, कुंभार्ली घाटातील एका वळणावर दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र पोलीस आणि ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या