नवीन वर्षात बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन वर्षात बाजार समित्यांच्या निवडणुका


 नवीन वर्षात बाजार समित्यांच्या निवडणुका 

नाशिक : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या दहांहून अधिक बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. इगतपुरीतील घोटी, येवला, मालेगाव, लासलगाव बाजार समिती यांची मुदत सहा महिन्यांपूर्वीच संपुष्टात आली आहे. ज्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत २३ ऑक्टोबर रोजी अथवा त्यापूर्वी संपुष्टात आली आहे, अशा बाजार समित्यांवर या तारखेपूर्वी प्रशासकाची नियुक्ती झाली आहे, अशा समित्यांच्या निवडणूका जाहीर कार्यक्रमाप्रमाणे होतील. या बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप व अंतिम मतदार याद्या दि. ३० सप्टेंबरपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संचालक मंडळाची मुदत दि. २३ ऑक्टोबरनंतर संपुष्टात येणार आहे, अशा समित्यांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र आदेश निघतील. निवडणूक कार्यक्रम असा: प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : १० नोव्हेंबर, अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ६ डिसेंबर, 

उमेदवारी अर्जविक्री व स्वीकृती

 १६ ते २२ डिसेंबर, अर्ज छाननी : २३ डिसेंबर, माघार : २४ डिसेंबर ते ७

जानेवारी, मतदान : १७ जानेवारी, मतमोजणी : १८ जानेवारी.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


टिप्पण्या

news.mangocity.org