रहदारी नसल्याने अनर्थ टळला ; खड्ड्यात आपटून कंटेनरचे चाक निखळले

  

 

रहदारी नसल्याने अनर्थ टळला ;खड्ड्यात आपटून कंटेनरचे चाक निखळले 

  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या कुरधुंडा येथील घटना 


संगमेश्वर:  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे हा सध्या चर्चेचा विषय आहे. विशेषत: संगमेश्वर ते बावनदी हा टप्पा तर प्रवास करावा कि नको अशी स्थिती आहे. 

 दुपारी याच टप्प्यात कुरधुंडा येथे मोठ्या खड्ड्यात आपटल्याने कंटेनरचे मागील चाक एक्सेलसह निखळले आणि रस्त्या पलीकडे जावून पडले. सुदैवाने याच दरम्यान मागून पुढून वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. 

....................................


टिप्पण्या