प्रकल्प मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ; नितीन गडकरींच्या उपस्थितीत चर्चा

 


प्रकल्प मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ; नितीन गडकरींच्या उपस्थितीत चर्चा

मुंबई: वन विभागाच्या परवानगीच्या कचाटय़ात वर्षांनुवर्षे अडकलेल्या राज्यातील सुमारे १५० रस्त्यांच्या कामांना वेळीच परवानगी मिळाली नाही तर हे प्रकल्पच गुंडाळण्याचा निर्वाणीचा इशारा केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी देताच, कोणत्याही परिस्थितीत त्वरित या सर्व मार्गाना परवानगी देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनास दिले. राज्यातील रस्ते विकास प्रकल्पांचा आता मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री स्तरावर प्रत्येक महिन्यात आढावा घेणार असल्याचेही ठाकरे यांनी  सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत राज्यातील रस्ते प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

राज्यातील अनेक रस्त्यांची कामे केवळ वन विभागाच्या परवानगीअभावी रखडल्याबद्दल गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली.

एके क प्रकल्प दोन-तीन वर्षांपासून रखडलेला असून त्यामुळे प्रकल्पाची किं मत वाढते तसेच लोकांनाही सुविधा मिळत नाही. वन विभागाच्या परवानग्या सहा महिन्यांत मिळाल्या नाहीत, तर हे प्रकल्प अर्ध्यावर सोडून द्यावे लागतील, असा इशारा गडकरी यांनी या वेळी दिला. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील रस्त्याची अतिवृष्टीमुळे होणारी स्थिती पाहता हे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविण्याची घोषणाही त्यांनी के ली.  पनवेल-इंदापूरदरम्यानचे काम रखडल्यामुळे  सरकारची बदनामी होत असल्याने तेथील कं त्राट रद्द करून नव्या

ठेके दाराकडून काम करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. तसेच मुंबईतील सागरी सेतू, पुणे रिंग रोड या प्रकल्पांचा अभ्यास करून मदत करण्याची ग्वाही गडकरी यांनी या वेळी दिली.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या