केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा बंदला विरोध -अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक


 केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा बंदला   विरोध -अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक 

राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे देखील या बंदमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.पुणे आणि नागपूरमध्ये व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला आहे,असा प्रश्न विचारल्या नंतर नवाब मलिकांनी भाष्य केले आहे. "केवळ बोटावर मोजण्याएवढ्या भाजपाच्या व्यापारी संघटनांचा विरोध आहे. सगळ्या मोठ्या संघटनांनी बंदला समर्थन दिले आहे. राज्यभर दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा अडवण्यात आलेल्या नाहीत. भाजपाला विरोध करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिल्याने तो यशस्वी झालेला आहे," असे नवाब मलिक म्हणाले

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या