माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी कटिबद्ध होवू या... --- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी कटिबद्ध होवू या...
--- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
निसर्गरम्य माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आज आपण सर्वांनी कटिबद्ध होवू या, असे प्रतिपादन पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज माथेरान येथे केले.
राज्य सरकारच्या नगरविकास आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून माथेरान गिरीस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा आज (24 ऑक्टोबर) रोजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुंबई सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि माथेरान नगरपरिषदचे पर्यटन दूत तसेच सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपवनसंरक्षक श्री.ठाकरे यांच्यासह माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, श्री.मनोहर भोईर, श्रीमती रेखा ठाकरे,चंद्रकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, माथेरानमधील शाश्वत विकास करताना स्थानिकांचा प्राथम्याने विचार करून रोजगार निर्मिती करायची आहे. माथेरानचे नैसर्गिक वैभव जतन करण्याची गरज आहे.यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील. माथेरान पुनर्जीवित करून माथेरानची जागतिक पातळीवरील ओळख अधिक ठळक करायची इच्छा आहेअसे त्यांनी सांगितले .
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा