संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नेत्रावती , मस्यगंधा एक्स्प्रेस थांबा मिळावा काँग्रेसची मागणी-अशोकराव जाधव .
संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नेत्रावती , मस्यगंधा एक्स्प्रेस थांबा मिळावा काँग्रेसची मागणी-अशोकराव जाधव .
संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेस महिन्यातून किमान 28 वेळा जाताना व येताना सिग्नल साठी सुमारे दहा ते विस मिनिटे थांबते त्याच प्रमाणे मस्यगंधा एक्सप्रेस ही महीन्यातून 22 ते 25 वेळा संगमेश्वर स्थानकात सिग्नल साठी थांबते रेल्वेच्या वेळा पत्रकाचा व आर्थिक ऊलाढालीचा विचार करता तसेच रेल्वे थांबवणे व परत चालू करणे यात होणारा डिझेल खर्चाचा विचार करता संगमेश्वर येथे या नेत्रावती एक्सप्रेस आणि मस्यगंधा एक्सप्रेस यांचा अधिकृत थांबा मिळाल्यास रेल्वेचा आर्थिक फायदा होयीलच पण त्याच बरोबर संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर , देवरूख , साखरपा ( कोंडगाव ) , माखजन , कडवई या बाजारपेठां सोबत सुमारे एकशे नव्वद गावांना फायदा होयील . संगमेश्वरला बुकींग कोठा ठेवल्यास रेल्वेला आर्थिक फायदा होयीलच पण इंधन खर्च जो सिग्नलसाठी गाडया थांबविल्या जातात तो खर्चही निघेल त्या मुळे कोकण रेल्वेने या गाडयांना दिवाळी पुर्वी कायम किमान दोन मिनिटाचा थांबा द्यावा व संगमेश्वर तालुक्यातील जनतेची सोय करावी अशी मागणी श्री अशोकराव जाधव ऊपाध्यक्ष, प्रवक्ता रत्नागिरी जिल्हा काँग्रेस , संगमेश्वर तालुका काँग्रेस च्या वतीने कोकण रेल्वे बोर्डाकडे करणेत आली आहे . या बाबत रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ऊपाध्यक्ष यांनी सांगितले की संगमेश्वर तालुक्यातील काँग्रेसचे शिष्टमंडळ व जिल्हा काँग्रेस संगमेश्वर स्थानकात नेत्रावती आणि मस्यगंधा एक्सप्रेस थांबे मिळविणे साठी प्रसंगी मांडवी एक्सप्रेस थांब्यासाठी आंदोलन करून मांडवी साठी थांबा मिळवला होता तसे प्रसंगी काँग्रेसच्या वतीने अंदोलन करणेत येयील . तसेच या मागणी करीता अशोकराव जाधव यांचे समवेत दत्ता परकार संगमेश्वर तलुका काँग्रेस अध्यक्ष , संदीप वेल्हाळ , कॅप्टन हनिफ खलफे , इलियास मापारी , सुनील पवार , आबासाहेब सावंत ,राजा मस्के , पाडूरंग घोरपडे , अनंत धामणे , नाना संसारे, मोहन सनगरे , मुरलीधर पांचाळ , प्रभाकर पांचाळ, राजू पाटील , मंगेश जाधव , रविंद्र नागवेकर, मुजीब खान , अनिस खान , मुझफ्फर मुल्ला , अफसर खान , अशोक पंडीत , विजय कदम , मंगेश सोनवडेकर , फारूख मुकादम , बिल्कीश मुकादम , बावा मेस्त्री , कैस मालगुडकर , आब्बास आंबेडकर , अनिल भुवड , दिलीप बोथले , बापू लोटणकर, राजेश पत्यानी , काका बोथले, बंटी गोताड , ऊत्तम गायकवाड , चाँदखान , अनिल कांबळे , ऊदय पवार , काका शेटये , सुरेश शिंदे, संदीप गवाणकर , रामभाऊ कुवळेकर , शिवराम रहाटे , गोवळकर , इत्यादी बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ताच्या संगमेश्वर तालुक्याच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने गंभीरपणे विचार करून दिवाळी पुर्वी नेत्रावती व मस्यगंधा या दोन्ही एक्सप्रेसला थांबा द्यावा अशी मागणी करणेत आली आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment