रत्नागिरीतील मजगाव रोड वरिल रेस्टॉरंट उघडे असल्याने वाहनचालकांना होतोय त्रास




 रत्नागिरीतील मजगाव रोड वरिल रेस्टॉरंट उघडे असल्याने वाहनचालकांना होतोय त्रास


रस्त्यावर होतेय वाहनांची गर्दी, दुर्गंधीही होतेय

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष, नगर परिषदेने कार्यवाही करण्याची नागरीकांची मागणी


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी शहरातील मजगाव रोडच्या नजिक असलेल्या एका रेस्टॉरंटमुळे संपुर्ण वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे रत्नागिरी मारुती मंदिर ते कोकण नगर यादरम्यान प्रवास करताना प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच हे रेस्टॉरंट बंदिस्त नसल्याने इथे तयार होणा-या पदार्थांमुळे धूर आणि झोंबणारा वास यामुळे प्रवासी हैराण होत आहेत. शिवाय डोळ्यांनीही त्रास होत आहे. मात्र एवढे होऊनसुद्धा अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे असा सवाल उपस्थीत केला जात आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, वाहतूक पोलिस विभाग आणि नगर परिषद प्रशासन यांनी मजगाव रोड परिसरातील रेस्टॉरंट ची पाहणी करुन आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून तसेच प्रवाशांमधूनही करण्यात येत आहे.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org