मराठी शाळांची फरपट


 मराठी शाळांची फरपट


जागतिकीकरणामुळे पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे वाढू लागला आहे.

१० वर्षांत ६५ टक्क्यांनी विद्यार्थी कमी

 गेल्या दशकभरात पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. गेल्या दहा वर्षांत मराठी शाळांची संख्याही कमी झाली असून १३० मराठी शाळा बंद पडल्या, तर विद्यार्थ्यांची संख्या ६५ टक्क्यांनी घटली आहे.

मुंबई महापालिकेने चालू शैक्षणिक वर्षांपासून सीबीएसई व आयसीएसईच्या मिळून १२ शाळा सुरू केल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षांत मुंबई पब्लिक स्कूलच्या नावाखाली अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. मात्र दुसरीकडे पालिकेच्या मराठी शाळा मात्र एकापाठोपाठ एक बंद पडत असून मराठी शाळांतील विद्यार्थी संख्याही घटत असल्याचे दिसू लागले आहे.

जागतिकीकरणामुळे पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे वाढू लागला आहे. गरीब घरातील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा खर्च परवडत नसल्याचे सांगत पालिकेने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर इंग्रजी माध्यमांच्या व अन्य बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा वेगाने बंद पडू लागल्या असून बंद पडलेल्या शाळेतील पटसंख्या जवळच्याच दुसऱ्या मराठी शाळेत विलीन करण्याची पालिकेवर वेळ आली आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी शिक्षण विभागाकडे याबाबत माहिती मागवली. गेल्या दहा वर्षांत मराठी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्या ६७,०३३ने घसरली, तर याच दहा वर्षांत मराठी माध्यमांच्या १३० शाळा बंद पडल्या. विद्यार्थी संख्येत ६५ टक्के तर शाळांची संख्या ३१ टक्क्यांनी घटली आहे.

भाजपची शिवसेनेवर टीका

मराठी शाळांच्या अधोगतीवरून भाजपने शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले. गेली तीस वर्षे मराठी अस्मितेचा आधार घेत मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेने मराठी शाळांची संख्या वाढण्यासाठी काय प्रयत्न केले. मराठी शाळांची पटसंख्या घसरत राहिली तर येत्या काही वर्षांत मराठी मुलांसाठी मराठी शाळा उरणार नाही, असा सवाल साटम यांनी केला.

हिंदूीउर्दू माध्यमांत दुप्पट विद्यार्थी

मराठी माध्यमांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली असली तरी हिंदूी आणि उर्दू या प्रादेशिक माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढत असून ती मराठी विद्यार्थ्यांच्या दुप्पट आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments