आलिशान क्रूझ सफरीला वेलदूर थांबा मिळणारअसल्याची आमदार भास्कर जाधव यांची माहिती
आलिशान क्रूझ सफरीला वेलदूर थांबा मिळणार असल्याची आमदार भास्कर जाधव यांची माहिती
मुंबई ते गोवा या सागरी मार्गावरील आलिशान प्रवास सुरू झाला असून याचा फायदा आता गुहागरला ही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई ते गोवा या प्रवासात या आलिशान क्रूझला गुहागर तालुक्यातील वेलदूर येथे थांबा मिळाला असून त्यासाठी आवश्यक असणार्या जेटीचे काम वेलदूर येथे अंतिम टप्प्यात आल्याची माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शृंगारतळी येथे दिली.
कोकण किनारपट्टीवरील सागरी निसर्गसौंदर्याचा आस्वात घेत या आलिशान क्रूझमधील सर्व सुखसोयींनी युक्त अशी ही सफर प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. मात्र, मुंबई ते गोवा अशी सोय असल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या क्रूझला थांबा नव्हता. गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी संबंधितांशी चर्चा करून वेलदूर येथे या क्रूझला थांबा मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी वेलदूर येथे जेटी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही आ. भास्कर जाधव यांनी दिली.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा