केतकी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अभियान चिपळूण अंतर्गत बीट कापरे चा पोषण महा उत्साहात साजरा.




 केतकी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अभियान चिपळूण अंतर्गत बीट कापरे चा पोषण महा उत्साहात साजरा.    

 माजी उपसभापती पांडुरंग माळी यांची उपस्थिती 

एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प  चिपळूण १ बीट कापरे चे वतीने राष्ट्रीय पोषण महिना दिनांक १ ते ३०  सप्टेंबर पोषण मास म्हणून साजरा करण्यात आला. या मध्ये  बीट कापरे अंतर्गत अंगणवाडी सेविका यांनी एकत्र येऊन पाककला विविधांतर्गत विविध  प्रकारच्या पोषक खाद्य  पदार्थ बनऊन त्याची छान मांडणी केलेली होती,  पोषण रॅली काढून जनजागृती करण्यात आली तसेच अन्न धान्य याच्या पासून बनविण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा ही घेण्यात आल्या. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमा साठी पंचायत समिती चे माजी उपसभापती सन्मा. पांडुरंग माळी प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे चे आरोग्य सहाय्यक श्री परशुराम निवेंडकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प चिपळूण चे बीट कापरे च्या मुख्य सेविका श्रीम. जाधव केतकी तंटामुक्त समिती चे अध्यक्ष श्री. सुरेश गोलंमडे,  ग्रामपंचायत सदस्य श्री. सुधीर मिंडे , वैशाली मिंडे , प्रदीप घाटगे ,  रवींद्र कांबळे , शिक्षक श्री. जयकुमार व्यवहारे,  ग्रामसेविका श्रीम.सूर्यवंशी, ग्रामस्थ रमेश जाधव,  नितीन सैतवडेकर,  ऋषिकेश मिंडे , निलेश  जाधव , मयुरेश जाधव , तेजस सैतावडेकर, मुकुंद सैतवडेकार, राजाराम कासेकर, संतोष मिंदे, प्रकाश जाधव तसेच सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. या वेळी उपसभापती माळी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर पोषण अहार व पोषण सप्ताह बाबत आरोग्य सहाय्यक श्री. निवेंडकर  यांनी मार्गदर्शन केले श्री. गोलमडे यांनी समतोल आहे म्हणजे काय  यावर माहिती सांगितली तर मुख्य सेविका जाधव यांनी समतोल आहार कसा असावा व पोषण मास का साजरा केला जातो या बाबत माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सर्व अंगणवाडी सेविका यांनी खूप मेहनत केली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन आपल्या उत्तम संभाषण कौशल्याने श्री. जयकुमार व्यवहारे गुरुजी यांनी केले शेवटी अंगणवाडी सेविका श्रीमती जुवळे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments