‘स्वाभिमानी’कडून मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन!


‘स्वाभिमानी’कडून मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन!

पूरग्रस्त शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळाल्याचं म्हणत व्यक्त केला संताप.

राज्यशासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत ही अत्यअल्प असल्याचं म्हणत, संतप्त झालेल्या शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाकडे पैसे नसतील, तर मंत्र्यांनी रोजगार हमीच्या कामावर जावे,अशा उपरोधिक शब्दात टीका केली आहे.

राज्य शासनाने पुरग्रस्तांना शेतकऱ्यांना अत्यल्प मदत केल्याचा आरोप करीत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी कुरुंदवाड येथे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. शेट्टी म्हणाले, ”राज्य शासनाने सन २०१९ च्या महापुरा प्रमाणे मदत करण्यात येईल असे सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वार्‍यावर सोडणार नाही, असे आश्वासित केले होते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना प्रतिगुंठा १३५ रुपये मदत करून फसवणूक केली आहे. शासनाकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमीवर कामाला जावे. शेतकऱ्यांना मदत देतानाच सरकारची तिजोरी कशी आटली जाते. शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केली असून त्याची किंमत चुकवावी लागेल.”

हजारो कोटीच्या प्रकल्पांचा शुभारंभ कोणाचा सातबारा गहाण ठेवून?-

स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची सायंकाळी भेट घेऊन शासनाने जाहीर केलेली मदत बदलून दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी केली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनाकडे पैसे नसताना अनेक मंत्री हजारो कोटीच्या प्रकल्पांचा शुभारंभ कोणाचा सातबारा गहाण ठेवून करत आहेत?, अशी विचारणा प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी केली. सावकर मादनाईक, वैभव कांबळे, बाळासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या