रत्नागिरी पंचायत समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन वादात






 रत्नागिरी  पंचायत समितीच्या  मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन वादात 

निमंत्रण पत्रिकेवर जि.प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांची नावेच नसल्याची धक्कादायक बाब समोर

 रत्नागिरी

रत्नागिरी  पंचायत समितीच्या  मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन सध्या वादात सापडले आहे.या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर जि.प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांची नावेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे जि.प. अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमाला गैरहजर असल्याचे दिसून आले. जि.प. अध्यक्षांनी तर या प्रकरणानंतर आक्रमक पवित्रा घेत संबंधीत गटविकास अधिकार्‍यांना कारणेदाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकारानंतर जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव हे आक्रमक झाले आहेत. या कार्यक्रमाला ते गैरहजर राहिले. या सर्व प्रकारणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून त्यापूर्वी संबंधीत गटविकास अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशा सूचना त्यांनी जि.प. प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे आता हे प्रकरण वादात सापडले आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org