अभिजित हेगशेट्ये लिखित सेवाव्रती हळबे मावशी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
अभिजित हेगशेट्ये लिखित सेवाव्रती हळबे मावशी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
इंदिराबाई हळबे यांनी मिसिंग वुमनला प्रेझेंट केले: पद्मश्री डॉ गणेश देवी
रत्नागिरी प्रतिनिधी:-
इंदिराबाई हळबे या देवरुख च्या सावित्रीबाई होत्या. त्या काळात त्यांचा एक एक दिवस यातनेचा होता. त्यांच्या अथक परिश्रमातूनच मातृमंदिराची स्थापना झाली. त्यांनी केलेल्या वैद्यकीय सेवेमुळे अनेक संभाव्य स्त्रीभ्रूण हत्या टळल्या. एका अर्थाने 'मिसिंग' वुमनला जीवदान मिळाले. मातृ मंदिरचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी या ' मिसिंग' वुमन ला पुस्तकातून पुन्हा सादर केले आहे. असे मत पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी सेवावृत्ती हळबे मावशी या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले. दुसऱ्याचं नुकसान करून केलेला विकास हा विकास होत नाही. ज्यावेळी सर्व पृथ्वी बेचिराख होईल तेव्हा अश्रू ढाळण्यासाठी फक्त स्त्री उरेल. स्त्रियांचा सन्मान फक्त कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता आपल्या आयुष्यातच स्त्रियांचा सन्मान असावा. माझ्या भारतात स्त्री दैवत असू शकते. भारतातल्या भाषानाही मातेचा दर्जा दिला आहे. समाजातील सर्व लोक माझे आहेत हे विचार रूढ झाले पाहिजेत. त्यानंतरच आपल्या देशात समानता, सर्व धर्म समभाव आहे, असे म्हणता येईल. विकास कामामुळे स्त्री भृण हत्या वाढत आहेत. इंदिराबाई हळबे मावशींनी मुलींना जन्माला येण्याची संधी दिली. ही संधी पुन्हा मिळावी हीच प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे असेही याप्रसंगी पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांनी सांगितले.
पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष व या पुस्तकाचे लेखक अभिजीत हेगशेट्ये यांनी मी मातृ मंदिर संस्थेचा सेवक आहे. जेव्हा मातृमंदिर मध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा मावशी बद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. त्या काळात मावशी कशा काम करत असाव्यात याचा विचार करता करता मी मावशींना शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या काळात रूढी, परंपरा अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होत्या. त्यावेळी त्यांनी ही संस्था स्थापन केली. हॉस्पिटल सुरू करण्याचा उद्देश पैसा कमावणे हा नव्हता. मावशींच्या प्रत्येक गोष्टीत वैचारिक उत्क्रांतीचा वाद होता. परिवर्तनाचा हा उत्क्रांती वाद मावशींच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यात दिसतो. मावशींनी मोठ्या प्रमाणात पाळणाघरे, बालवाड्या, बचत गट सुरू केले. खऱ्या अर्थाने पोषण आहाराची खरी सुरुवात मावशींनीच केली. त्यासाठीच मावशी माझ्यासाठी आदर्शवत आहेत असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्र सेवा दलाचे पद्मश्री डॉ. गणेश देवी, ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल, संगमेश्वर तालुक्याचे सुपुत्र, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, राष्ट्र सेवा दलाचे प्रकाशनचे संदेश भंडारे, मातृमंदिरचे कार्यवाह आत्माराम मेस्त्री, सुदेश हिंगलासपूरकर, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा संघटक युयुत्सु आर्ते, डॉ.सुरेश जोशी, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटणकर, सतीश कामत, सौ.सीमा हेगशेट्ये, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुचेता कोरगावकर, सतीष शिर्के, संतोष शेट्ये, सुजित झिमण, विवेक सावंत, प्रताप सावंतदेसाई, अशोकराव जाधव, बापू शेट्ये, काका जोशी, विलास कोळपे, नाना कोळवणकर, राजापूरातील बी.के.गोंडाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment