कोकणातील 'या' मराठमोळया उद्योजकावर कॅनडाचे पंतप्रधानही खुश, वाढदिवसानिमित्त पाठवलं खास गिफ्ट

  • konkan
    • कोकणातील 'या' मराठमोळया उद्योजकावर कॅनडाचे पंतप्रधानही खुश, वाढदिवसानिमित्त पाठवलं खास गिफ्ट

    • कोकणातील 'या' मराठमोळया उद्योजकावर कॅनडाचे पंतप्रधानही खुश
    • वाढदिवसानिमित्त पाठवलं खास गिफ्ट
    • कामगारावर प्रेम करणारा अवलिया म्हणून सतीश वाघ यांची ओळख
  • रत्नागिरी : खेड कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील लोटे येथील सुप्रिया केमिकल कंपनीचे मालक उद्योजक सतीश वाघ यांना ६५ व्या वाढदिवसानिमितांने कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्याकडून कौतूकाचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे मराठमोळया उद्योजकाचे गौरव प्रमाणपत्र प्रसिद्ध लेखक, कॅनडाच्या पंतप्रधानांचे दूत डॉ. ढवळे यांनी कॅनडाहून आणले व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सतीश वाघ यांना हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सुप्रिया केमिकल कंपनीचे मालक सतीश वाघ यांच्या सुप्रिया केमिकल कंपनीचे काम सातासमुद्रापार पोहचले आहे. कंपनीच्या हिताच्या दृष्टीने वाघ ही अहोरात्र परिश्रम घेत आहेत. 'ओषधी रसायने व औषधी मूलद्रव्य' याचे उत्पादन सतीश वाघ यांच्या सुप्रिया केमिकल्स कंपनीच्या माध्यमातून घेतले जाते.
  • गेली तब्बल ३६ वर्षे ते उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यासाठी जगभर भ्रमंती करीत असतात. त्यांच्या कंपनीवर अनेक कामगारांचे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे आणि कामगारावर नितांत प्रेम करणारा अवलिया म्हणून सतीश वाघ यांची कोकणात विशेष ओळख आहे. नुकताच त्यांचा ६५ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला यावेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली व कौतूक केले.
  • सतीश वाघ आपले काम कोतुकास्पद आहे उत्तरोत्तर अशीच प्रगती करून देशाचे नाव उज्जल करावे अशा शब्दात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी प्रमाणपत्रच्या माध्यमातून दिल्या आहेत. मराठी उद्योजक सतीश वाघ यांचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी कोतुक केल्याबद्दल अनेकांनी सतीश वाघ यांचे कोतुक केले आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या