कुंभवडे आरोग्य केंद्राच्या निकृष्ट कामाविरोधात उपोषणाचा इशारा


 कुंभवडे आरोग्य केंद्राच्या निकृष्ट कामाविरोधात उपोषणाचा इशारा


जनतेच्या कररूपी पैशातून विकासकामांसाठी येणार्‍या निधीची शासकीय अधिकारी कशी उधळपट्टी करतात आणि लोकप्रतिनिधी अशा प्रकारांकडे कशी डोळेझाक करतात याचा प्रत्यय तालुक्यातील कुंभवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट नूतनीकरण कामातून आला आहे. दरम्यान या प्रकरणी शासन स्तरावरून लक्ष वेधण्यासाठी जागरूक ग्रामस्थ संदीप पांचाळ यांनी १ नोव्हेंबर रोजी आरोग्य केंद्राच्या आवारात आमरण उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी प्रांताधिकार्‍यांशी पत्रव्यवहार केला आहे.

नुतनीकरणाचे काम दर्जेदार हवे, अशा आशयाचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. मात्र या ठरावाला महिना उलटला तरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अपुरे आणि निकृष्ट साहित्य जैसे थे असल्याने अखेर जागरूक ग्रामस्थ संदीप पांचाळ यांनी पुढे येत आक्रमक भूमिका घेतली आहे.    


....................................

बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256          

टिप्पण्या