कॅप्टन कुल धोनीने चेन्नईला पोहचविले फायनलमध्ये

 


कॅप्टन कुल धोनीने चेन्नईला पोहचविले फायनलमध्ये

 टी २० च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने अखेरच्या षटकांत दिल्लीवर चार गड्यांनी विजय मिळवला.

दिल्लीच्या पृथ्वी शॉ याच्या वेगवान खेळीपेक्षा चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड याची ७० धावांची खेळी भारी पडली.

दिल्लीने प्रतिस्पर्धी संघ चेन्नईसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान चेन्नईने १९.४ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

या सुपर विजयासह चेन्नईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. विशेषबाब चेन्नईचा संघ नवव्यांदा टी २० लीगच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

धोनी ठरला मॅच फिनिशर...

सलग गडी बाद झाल्यानंतर चेन्नईचा विजय कठीण वाटत असताना कर्णधार महेंद्र सिंह धोनी मैदानात आला. त्याने आवेश खानला षटकार लगावला. त्यानंतर अखेरच्या षटकांत टॉम कर्रन याला दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार लगावले. अखेर विजयी चौकार खेचत धोनीने संघाला फायनलमध्ये पोहचविले. 


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या