मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.मराठी भाषा विभागातर्फे 'मराठी भाषा भवन मुख्य केंद्र' प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेअंतर्गत वास्तूविशारदांनी आज सादरीकरण केले.
यावेळी चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव मांडले. यामध्ये प्रदर्शन दालन सभागृह, परिषद दालने, ग्रंथालय असे विभाग दर्शविण्यात आले. या प्रकल्पासाठी शासनाने 2500 चौ. मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे. डिसेंबर 2021 मध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येईल तर पुढील अठरा महिन्यात मराठी भाषा भवन खुले केले जाईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा