राजापूर तालुक्यातील काजिर्डा जामदा मध्यम प्रकल्प संघर्ष समितीने भुसंपादन व पुनर्वसन संदर्भात घेतली खासदार विनायक राऊत यांची भेट...
ठेकेदाराच्या बेकायदेशीर बिलापोटी भूसंपादनाची रक्कम बेकायदेशीर रित्या खर्च केल्यामुळे प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर..
दिवाळीनंतर सर्व धरणांची पाहणी करून अधिकाऱ्यांसहित बैठक घेणार - खासदार विनायक राऊत
रत्नागिरी जिल्ह्यातील जामदा मध्यम प्रकल्प काजिर्डा ता.राजापूर या धरण प्रकल्पाचे काम सन २००४ पासून सुरु झालेले आहे. सदर कामाबाबत प्रकल्पग्रस्त अनेक वेळा मिळणारा भूसंपादनाचा मोबदला, मिळणारे भू-भाडे याबाबत वेळोवेळी गेली १६ वर्षे मागणी करत आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करणे याबाबतीमध्ये सुध्दा अनेकवेळा पत्र व्यवहार केलेला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि पुनर्वसनांसाठी करण्यात आलेली तरतूद ही ठेकेदाराच्या बिलापोटी खर्च करण्यात आली आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. खरेतर भूसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्या शिवाय धरणाच्या कामाला सुरुवात करु नये. अशा प्रकारची प्रकल्पग्रस्तांची मागणी होती व आहे. परंतु प्रशासनाला हाताशी धरुन ठेकेदाराने ४०% काम पूर्ण होऊनही अद्याप पर्यत प्रकल्पग्रस्तांचे भूसंपादन व पुनर्वसन झालेले नाही. भूसंपादनाचे आलेले पैसे ठेकेदाराने आपल्या बिलांच्या रक्कमा काढून घेवून ७०० कुटुंब प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडण्याचे काम चालू आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आता आक्रमक झाले आहेत.
तरी अधिकारी स्तरावर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी व आमचा पुनर्वसन व भूसंपादनाचा विषय मार्गी लावावा. अशी विनंती जामदा मध्यम प्रकल्प काजिर्डा संघर्ष समितीने भुसंपादन व पुनर्वसन संदर्भात करण्यात आलेली तरतूद ठेकेदाराच्या बिलापोटी
बेकायदेशीर रित्या खर्च केल्याबाबत आज खासदार विनायकजी राऊत यांची राजापूर शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन निवेदन दिले.
त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मी पूर्णपणे पाठीशी आहे. दिवाळीनंतर सर्व धरणांची पाहणी करून अधिकाऱ्यांसहित बैठक आयोजित करतो असे आश्वासन दिले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment