आर.डी.सी.सी. बँकेचे तानाजीराव चोरगें विरोधात चिपळूणात तिव्र नाराजी




 आर.डी.सी.सी. बँकेचे तानाजीराव चोरगें विरोधात चिपळूणात तिव्र नाराजी


 

जयंद्रथ खताते यांचे खळबळजनक आरोप


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आता राजकिय रंगत यायला सुरुवात झाली आहे. बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांच्या विरोधातच थेट चिपळूणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नावाने पॅनेल काढायचे आणि आपल्या मर्जितीलच लोकांना संचालक म्हणून निवडायचे. हेच काम तानाजीराव चोरगे करतात अशी सडकून टीका खताते यांनी केली आहे.  या गोष्टींना कुठेतरी न्याय द्यावा. सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळावा या हेतूने आम्ही स्वतंत्र पॅनेल काढत असल्याची माहीती चिपळूण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी माहिती दिली. पुढे म्हणाले की आमची नाराजी तानाजीराव चोरगेंवर आहे. आमदार शेखर निकम यांच्यावर आमची नाराजी नाही. पक्ष म्हणून तानाजीराव चोरगे यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. चोरगे यांनी उभे केलेले उमेदवार पक्षाचे म्हणून नाही तर ते चोरगे यांचे स्वत:चे उमेदवार आहेत. त्यांच्या भूमिकेला आमचा ठाम विरोध आहे. असे मत खताते यांनी व्यक्त केले आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या