राजापूर नगर परिषदेमार्फत नागरीकांसाठी इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग पॉईंटची सुविधा





 राजापूर नगर परिषदेमार्फत नागरीकांसाठी इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग पॉईंटची सुविधा


लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या हस्ते या सुविधेचा झाला शुभारंभ


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर नगर परिषदे मार्फत माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपकम राबविण्यात आले. या निमित्ताने इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग पॉईंटचाही शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या हस्ते करण्यात आला.   

राजापूर नगर परिषदेमार्फत माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने गांधी जयंतीचे औचित्य साधू जनजागृतीपर प्रभात फेरी, स्वच्छता मोहिम, वृक्ष लागवड, हरित शपथ असे उपकम राबविण्यात आले. तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन व बचत गटांच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सफाई कर्मचा-यांचाही सन्मान करण्यात आला.  नगर परिषदेने इंधन विरहीत बॅटरीवर चालणा-या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग पाॅईंट उपलब्ध करून दिले असून याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.  



या प्रसंगी मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे यांच्यासह सर्व नगरसेवक,नगरसेविका, मुख्यलिपीक जितेंद्र जाधव, आरोग्य निरीक्षक सौ.श्रेया शिरवटकर, अनुष्का जुवेकर, राजन जाधव, संदेश जाधव, जुवेरिया मुन्शी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या