रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी जिल्ह्यातील दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले

 रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी जिल्ह्यातील दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले


रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी जिल्ह्यातील दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.  यावेळी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, कृषी सभापती रेश्मा झगडे, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, माजी सभापती महेश म्हाप, जि. प. सदस्य आबा आडीवरेकर, डाएटचे प्राचार्य गजानन पाटील, शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर उपस्थित होत्या. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांना शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये मंडणगड - एकनाथ चांदे, पदवीधर शिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शेडवई, दापोली - महेश कोकरे, उपशिक्षक, जि.प.आदर्श मराठी शाळा, मौजे दापोली, खेड - राजेश भागणे, उपशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, करजी कुणबी, चिपळूण - शितल राजे. उपशिक्षिका, जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा गोवळकोट मराठी, गुहागर - ममता विचारे, प्राथमिक शिक्षिका भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जि. प. आंतरराष्ट्रीय शाळा अंजनवेल क्र. 2. संगमेश्वर - नथूराम पाचकले, पदवीधर शिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आंबेड बुद्रुक क्र. 2. रत्नागिरी - विद्याधर कांबळे, पदवीधर शिक्षक, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा लाजूळ क्र. 1. लांजा - नानासाहेब गोरड, पदवीधर शिक्षक, जि. प. आदर्श शाळा देवधे क्र.3. राजापूर - दिपक धामापूरकर, पदवीधर शिक्षक, जि.प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सोलगाव क्र. 2. विशेष पुरस्कार सुनिल भोसले, पदवीधर शिक्षक, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा खानवली क्र. 3 या शिक्षकांचा समावेश आहे.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या