रत्नागिरीत पॅन इंडिया अवेअरनेस कँपेन
रत्नागिरी प्रतिनिधी:-
पॅन इंडिया अवेअरनेस कँपेनचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एम क्यू एस एम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश एक श्री एल डी बिले, इतर न्यायाधीश वर्ग उपस्थित होते. महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधींच्या फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश आनंद सामंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी जाहीर केले. सदर कार्यक्रमाला वकील संघाचे अध्यक्ष श्री डि आर धारिया, वकील वर्ग, महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री देव सर आणि बर्वे सर, विधी विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी, कायदा साथी उपस्थित होते. लोकांमध्ये पॅन इंडिया अवेअरनेस कॅम्पेनची आज पासून सुरुवात होत असल्याने सदरची मोहीम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आणि कार्यक्रमाची माहिती लोकांना करून देण्याकरता रॅली काढण्यात आली. त्याची सुरुवात जिल्हा न्यायालय ते आठवडा बाजार तसेच मारुती मंदिर सर्कल येथून पुन्हा जिल्हा न्यायालयात येऊन संपन्न झाली. बार असोसिएशन, कायदा साथी आणि विद्यार्थी यांच्या सहभागातून मोटर बाईक रॅली काढण्यात आली. सुमारे पाचशे लोकांना विधी सेवे संबंधात माहितीपत्रके वाटण्यात आली. Pan इंडिया अवेअरनेस द्वारे तळागाळातील लोकांपर्यंत न्यायाची संकल्पना, कायदेविषयक हक्क, अधिकार, विधी सेवा संस्था आणि प्रत्यक्ष न्याय याबाबत जनजागृती कार्यक्रम गावोगावी घेण्यात येणार आहेत.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



Comments
Post a Comment