राजापूर तालुक्यात पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस


 राजापूर  तालुक्यात पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस 

 राजापूर रत्नागिरी

 राजापूर तालुक्यात पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांपासून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत होता. राजापुरातही पाऊस पडत होता. सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून राजापूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सध्या भात कापण्याचे कामे जोरदार सुरू आहेत. अशा परिस्थितीत हा पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी देखील चिंतेत पडला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आता ही भात कापणीच्या काळात देखील पाऊस पडत असल्यामुळे कापून ठेवलेल्या भाताचे मोठे नुकसान होणार आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या