रत्नागिरी शासकीय विभागीय ग्रंथालय दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी ४.२५ कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता





रत्नागिरी शासकीय विभागीय ग्रंथालय  दुरुस्ती आणि  सुशोभीकरणासाठी ४.२५ कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत 


  रत्नागिरी: मा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी  उपक्रमाअंतर्गत शासकीय विभागीय   ग्रंथालय  रत्नागिरी या  कार्यालय इमारतीच्या दुरुस्ती, नूतनीकरण आणि  सुशोभीकरणासाठी ४.२५ कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीतथा सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली.

श्री.सामंत म्हणाले की, ग्रंथालय अधिक संमृद्ध करण्यासाठी व वाचकांना अधिकाधिक व आधुनिक सेवा देण्याकरीता ग्रंथालयाचे आधुनिकीकरण, संगणीकीकरण व डिजीटलायझेशन व अत्याधुनिक ग्रंथालयातील वाचन साहित्य व साधने विकसीत करणे आवश्यक आहे.  सन १९७२ पासून या इमारतीचे किरकोळ स्वरुपाच्या दुरुस्त्या वगळता भरीव असे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत ग्रंथालयातील लोकमान्य टिळक यांचे स्मारक असलेले दालन, वाचन कक्ष, ग्रंथालयीन कर्मचारी कक्ष या ठिकाणी छतावरचे पाणी झिरपत असून काही ठिकाणी छताचे स्लॅब कोसळत आहे. व त्यातून जिवित हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच ग्रंथालयाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी पडझड झालेली आहे. या सर्व कारणाने ग्रंथालयाचे नुतनीकरण, सुशोभीकरण व आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे.असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या