लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक सुरू करण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष -ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांचा आरोप


 लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक सुरू करण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे व लोकप्रतिनिधींचे  दुर्लक्ष -ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांचा आरोप  

रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारकाकडे दुर्लक्ष केले जात आहे  हे स्मारक खुले व्हावे यासाठी आपण अनेक महिने प्रयत्न करीत आहे  मात्र पुरातत्त्व विभागापासून जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांनी केला आहे  

हे स्मारक सुरू व्हावे यासाठी आपण मागील जिल्हाधिकार्यांकडेही  प्रयत्न केले होते मात्र  त्यांनी पुरातत्त्व विभागाला सूचना केल्याचे सांगितले होते प्रत्यक्षात पुरातत्त्व विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे  हे स्मारक बघण्यासाठी राज्यातून विविध भागातून लोक येत आहेत मात्र त्यांना हे बंद स्मारक दिसत आहे  त्यामुळे पर्यटकांना हे स्मारक खुले करून द्यायचे नाही पुरातत्त्व विभागाची भूमिका आहे काय? त्यांना जाब कोण विचारणार असा सवालही राजाभाऊ लिमये यांनी केला आहे  या पुरातत्त्व विभागाला स्थानिक आमदार खासदार व पालकमंत्री  जाब विचारत नाही ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचेही लिमये यांनी म्हटले आहे  

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या