राज्यातील जीएसटी वसुलीत वाढ; मात्र जुलैच्या तुलनेत कमीच

 


राज्यातील जीएसटी वसुलीत वाढ; मात्र जुलैच्या तुलनेत कमीच

वस्तू आणि सेवा कराच्या राज्यांच्या वसुलीच्या यादीत महाराष्ट्र नेहमीच पहिल्या क्र मांकाचे राज्य असते.

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये राज्यातील वस्तू आणि सेवा कराची वसूली वाढली असली तरी जुलै महिन्यात झालेल्या वसुलीपेक्षा ही दोन हजार कोटींपेक्षा कमीच आहे. सप्टेंबरमध्ये राज्यातून १६ हजार ५८४ कोटींची वसुली झाली. ऑगस्टमध्ये १५,१७५ हजार कोटी एवढी वसुली झाली होती. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये वसूली दीड हजार कोटींनी वाढली असली तरी जुलैच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण कमीच आहे.

जुलै महिन्यात राज्यात १८,८९९ कोटींची वसुली झाली होती. या तुलनेत सप्टेंबरमधील वसुली ही दोन हजार कोटींपेक्षा कमीच आहे.ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सणासुदीच्या काळात अर्थचक्र  अधिक गतिमान होण्याचा अंदाज वर्तविला जातो. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा वस्तू आणि सेवा कराची राज्यातील वसुली अधिक असली तरी करवसुली अधिक होण्याची आवश्यकता व्यक्त के ली जाते.

वस्तू आणि सेवा कराच्या राज्यांच्या वसुलीच्या यादीत महाराष्ट्र नेहमीच पहिल्या क्र मांकाचे राज्य असते.सप्टेंबरमध्ये तमिळनाडू (७,८४२ कोटी) दुसऱ्या क्रमांकावर असून, कर्नाटकात (७७८३ कोटी) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments