सामान्य जनतेचा बँक खाजगीकरणाच्या विरुद्ध बुलंद आवाज दिल्लीला जाणार...
सरकारी अर्थात राष्ट्रीयकृत बँक खाजगीकरणाच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) बँक संघटनेने विद्यमान सरकारच्या विरोधात देशव्यापी आमजनता "स्वाक्षरी मोहीम" अभियानाचे आंदोलन छेडले आहे.
▪️या आंदोलनाचा एक भाग म्हणून 2 ऑक्टोबर रोजी "राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती"निमित्ताने महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉईज फेडरेशनचे (MSBEF) जनरल सेक्रेटरी कॉम्रेड देविदास तुळजापूर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आम जनतेची व ग्राहकांची "स्वाक्षरी अभियान आंदोलनास" सुरुवात केली.
▪️या संघटनेच्या बरहुकूम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये "स्वाक्षरी अभियान" मोहिमेस 17 ऑक्टोबर 2021 रोजी रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथे प्रारंभ करण्यात आला.
▪️ MSBEF चे असिस्टंट सेक्रेटरी कॉ. राजेंद्र गडवी व जिल्हा समन्वय समितीचे कन्व्हेनर कॉ. विनोद कदम यांनी या वेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हाच कार्यक्रम दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
▪️ठरल्याप्रमाणे दि. 19 ऑक्टोबर रोजी राजापूर शहर, लांजा शहर, दापोली शहर व संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहर, तालुक्याचे ठिकाण येथे आज मान. पंतप्रधान यांना देण्याच्या निवेदनावर सह्यांची आमजनतेची व ग्राहकांची "स्वाक्षरी अभिमान मोहीम" सुरू करण्यात आली.
▪️लांजा शहरातून 1000 तर राजापूर व दापोली मधून प्रत्येकी 500 निवेदनावर सह्या घेण्यात आल्या. या तीनही ठिकाणी सामान्य ग्राहक व जनतेने खूपच गर्दी केली आणि खाजगीकरणाच्या विरोधात भूमिका बजावली.
▪️ देवरूखात या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी संघटनेचे सर्व कार्यकर्ते कॉम्रेड विनोद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुखची ग्रामदेवता "श्रीदेवी सोळजाई" देवीची मनोभावे पूजा करण्यात आली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले ग्रामस्थ व मंडळाचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र गांधी यांना स्वाक्षरी मोहिमेचे महत्व विशद करण्यात आले. सोळजाई देवी ही 44 खेड्यांची मालकीण असल्याने मंडळाचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र गांधी यांची प्रथम पंतप्रधान यांना देण्याच्या निवेदनावर सही घेण्यात आली आणि मोहिमेला सुरुवात झाली.
▪️ तद्नंतर देवरुखच्या उपनगराध्यक्षा सौ. सानवी संसारे यांनी स्वाक्षरी मोहीम अभियानाच्या ठिकाणी येऊन सही करून सुरुवात केली. यानंतर मनसेचे देवरुख शहर प्रमुख सागर संसारे, नगरसेवक वैभव पवार, नगरसेवक बाबू मोरे, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, नगरसेविका निधा कापडी, सामाजिक कार्यकर्ते व जनतादल पक्षाचे पदाधिकारी मिहीर आर्ते, माजी सभापती संतोष लाड, रत्नागिरी कृषी बाजार समितीचे मा. सभापती बाळूशेट ढवळे, जिल्हा परिषदचे मा. अध्यक्ष रोहनजी बने यांनी भेटी देऊन या सर्वांनी निवेदनावर सह्या केल्या व जनतेला उद्देशून मार्गदर्शन ही केले. यावेळी त्यांनी सरकारी बँक खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही बँक कर्मचाऱ्याचा बाजूने उभे राहू याची ग्वाही दिली. आम जनतेला जागरूक करण्याचे काम आम्ही करू असे ही सांगितले.
▪️ देवरूख मधील आजच्या या "स्वाक्षरी मोहिमेला" देवरूखातील सामान्य जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. तब्बल 2000 पेक्षा जास्त लोकांनी स्वाक्षरी अभियान येथे भेट देऊन सह्या केल्या.
▪️देवरूखातील आजची स्वाक्षरी मोहीम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड ज्ञानेश्वर ठाकूर, आधार वासनीक, कृष्णा तिवारी, आशिष बोकडे, प्रकाश पाटील, योगेश कदम, राजू नारकर, दिलीप सवर्डेकर, अधिकारी संघटनेचे कॉ. रमेश माळी, कॉ. सौरभ थूल, सेवानिवृत्त संघटनेचे कॉ. गजानन रहाटे, भगवान यादव, दामू साळसकर, सदानंद सुर्वे याच बरोबर संगमेश्वर, कुरधुंडा, साखरपा, कसबा व कडवई शाखेतील सर्व सभासद या सर्वांनी अपार मेहनत घेतली.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा