पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या पूर्वनियोजित ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा ठरल्याप्रमाणे घ्याव्यात -अभाविपची मागणी


 पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या पूर्वनियोजित ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा ठरल्याप्रमाणे घ्याव्यात -अभाविपची मागणी 

२५ ऑक्टोबर २०२१ पासून पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या पूर्वनियोजित ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा अचानक पणे अल्प कालावधीत कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केल्या आहेत. त्याचसोबत मनमानी कारभार करत ८ नोव्हेंबर २०२१ पासून विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ न देता ऑफलाईन परीक्षांचे आयोजनाचे आदेश काढले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. इतक्या कमी कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करणे जिकीरीचे होणार आहे. तरी आपण या निर्णयाचा पुनर्विचार करून पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या पूर्वनियोजित ऑनलाईन प्रात्यक्षिक परीक्षा ठरल्याप्रमाणे घ्याव्यात. अन्यथा अभाविप या विषयावर तीव्र आंदोलन करेल असे मत कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी व्यक्त केले आहे.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या