शेतकरी आंदोलन समर्थनार्थ रत्नागिरी काँग्रेसचा एल्गार


 शेतकरी आंदोलन समर्थनार्थ रत्नागिरी काँग्रेसचा एल्गार

रत्नागिरी प्रतिनिधी:-

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचने नुसार रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या मार्गदर्शनखाली लखिमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडणाऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ व शेतकरी विरोधी भाजपा सरकार ,मोदी सरकारच्या विरोधात रत्नागिरी येथील काँग्रेस भवन ते रामआळी, आठवडा बाजार ते काँग्रेस भवन अशी रॅली काढण्यात आली. तदप्रसंगी मोदी सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे , जय जवान जय किसान अश्या घोषणांनी रामआळी परिसर दणाणून गेला होता. महाराष्ट्र बंद च्या घोषणेला स्वयमस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता व  दुकाने बंद करून व्यापारीनी बंदला प्रतिसाद दिला. तदप्रसंगी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी, जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, जिल्हा सरचिटणीस बंटी गोताड, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख, विधानसभा क्षेत्रअध्यक्ष सचिन मालवणकर, बाळा करंजवकर, युवकचे चेतन नवरंगे, रवींद्र खेडेकर इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या