शब्द लहरी
शब्द लहरी
------------------------
निसर्ग
तुळशीच्या मूळरुपात भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते.तुळशीची पाने, बियाणे सर्व रोगोपचारांमध्ये उपयोगी आहेत. हेच कारण आहे की, तुळशीचे रोप आज प्रत्येक भारतीय घरात पाहायला मिळते. तसेच अशोकाच्या पानांपासूनही अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी बनवल्या जातात.लिंबाच्या झाडाबद्दल तर काय बोलावे? याची उपयोगिता अवर्णनीय आहे.लिंबाचा रस,पाने,बियाणे सर्वच उपयोगी आहे.लिंबाचे खरंच मानवाला खूप फायदे आहेत म्हणूनच म्हटले जाते, ‘सर्वरोग हरो निम्बः’.
मानवांना जवळजवळ सर्व वन संपत्तीचा फायदा होतो.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
-------------------------------------------
माझी लेखणी
आयुष्यात मार्गक्रमण करताना
प्रसंगानुरूप हाताळू शकते
ती व्यक्ती जग जिंकण्याची
जिद्द ठेवून पुढे जाण्यासाठी
हिंमतीने पाऊल टाकते ....
कल्पना टेंभूर्णीकर नागपूर
------------------------------------
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
योगादिके साधने । साकांक्ष आराधने । मंत्रयंत्र विधाने । झणी कराता ।।
देवतांतरा न भजावे । हे सर्वथा
काही न करावे । तुम्ही स्वधर्मयज्ञी
यजोनी अनायसे ।।
अहेतुके चित्ते ।अनुष्ठा पां ययाते ।
पतिव्रता पतीते । जियापरी ।।
देखा स्वधर्माते भजाल । तरी
कामधेनू हा होईल । मग प्रजाहो न
संडील तुमते कदा ।।
योगादी साधने मंत्रतंत्रादी अनुष्ठान ,मनात आकांक्षा ठेऊन
दैवताराधना करण्याच्या नादी
लागू नका .
या गोष्टी धर्म समजून करू नका
वर्णाश्रमाप्रमाणे जो सहज प्राप्त धर्म
आहे त्याच यज्ञाचे सुखाने अनुष्ठान
करा .
ज्या प्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या
पतीची सेवा निष्काम बुद्धीने करते
त्या प्रमाणे स्वधर्माचे निष्काम बुद्धीने
निर्हेतूक चित्ताने आचरण करा .
जर स्वधर्माने वागाल तर तो
धर्मच म्हणजेच वर्णाश्रम धर्मच कामधेनु प्रमाणे इच्छित फल देणारा होईल.
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नाशिक
--------------------------------------------------
विचारधारा
माणूस हा सर्वांत श्रेष्ठ प्राणी म्हणून ओळखला गेलेला आहे. हे,सर्वांनाच चांगल्या प्रकारे माहीत आहे. मग असं का? म्हणून होतं की, माणसालाचं पाहून माणूस आपल्या मनामध्ये भिती ठेवून जगत आहे. याचे थोडे तरी कारण आहे ते म्हणजेच की, माणूस हा आपल्यातील थोडीतरी का होईना माणुसकी विसरलेला आहे. हे,सिध्द होते.
सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
-------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा