देशभरातील कोळसा टंचाईचा गृहमंत्री शहा यांच्याकडून आढावा


देशभरातील कोळसा टंचाईचा गृहमंत्री शहा यांच्याकडून आढावा

ऊर्जा व कोळसा मत्रालयांचे उच्चपदस्थ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

देशात कोळशाची टंचाई निर्माण झाल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी ऊर्जामंत्री आर. के. सिंह आणि कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांच्याबरोबर बैठक घेतली.

सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत या तीन मंत्र्यांनी वीज केंद्रांना कोळशाची उपलब्धता आणि सध्याची विजेची मागणी याबद्दल चर्चा केल्याचे कळते. ऊर्जा व कोळसा मत्रालयांचे उच्चपदस्थ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. वीज केंद्रांना कोळशाचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे विजेचे संकट उद्भवू शकते असा इशारा अनेक राज्यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.

उपलब्ध आकडेवारीनुसार, ८ ऑक्टोबरला विजेचा वापर ३९०० एमयू इतका, म्हणजे या महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक झाल्यामुळे, सध्याच्या कोळसाटंचाईच्या काळात हे चिंतेचे कारण झाले. देशात कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले असले, तरी जोरदार पावसामुळे हा कोळसा खाणींमधून वीजनिर्मिती केंद्रांपर्यंत नेण्यात अडथळे आहेत. त्यामुळे गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली व तमिळनाडूसह अनेक राज्यांतील वीजनिर्मितीवर विपरीत परिणाम झाला.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या