रत्नागिरीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नौसीन काझी यांना रिलिफ फाऊंडेशन (कतर) तर्फे महाड येथील कार्यक्रमात सन्मान
रत्नागिरीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नौसीन काझी यांना रिलिफ फाऊंडेशन (कतर) तर्फे महाड येथील कार्यक्रमात सन्मान
रत्नागिरी प्रतिनिधी:-
मायदेशात तसेच परदेशात कामानिमित्त राहूनही सामाजिक कार्यात सदैव पुढे येवून काम करणे तसेच परदेशामध्ये कोकण कमिटीच्या माध्यमातून कोकणी असो वा इतर राज्यातील भारतीय नागरिक सदैव त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे, मायदेशामध्येही वादळ, कोरोना, पुर परिस्थिती येणे यामध्ये सदैव पुढे राहून मदतीचे कार्य करत राहिले. अशा हरहुन्नरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रत्नागिरी कोकणनगर येथील कार्यकर्ते नौसिन काझी यांच्या कार्याची दखल रिलीफ फाऊंडेशन (कतर) ने घेतली व महाड येथे झालेल्या एका भव्य दिव्य समारंभात जिथे कोकणातील मान्यवरांच्या बरोबर रत्नागिरीतील नौसीन काझी यांनाही सम्मानित करण्यात आल्याने नौसीन काझी यांचे सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रायगड आणि रत्नागिरीचे खासदार सूनिल तटकरे, कोकण मर्कंटाईल बँकेचे मुख्य संचालक तथा ठाणे महानगपालिकेचे गट नेते माननिय नजीब मुल्ला, NCP महाराष्ट्र प्रदेश प्रांतीक सदस्य बशीर मुर्तूजा, महाड-माणगाव पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरत गोगावले, नझीर हूर्जुक, कोकण बँकेचे उपाअध्यक्ष आसिफ दादन व इतर मान्यवर उपस्थित होते.
या भव्य समारंभाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष सिकंदर जस्नाईक होते. तथा मुख्य आयोजक सामजिक कार्यकर्ते खालिद चौगुले, हनीफ घनसार, अली कौचाली हे मान्यवर होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा