रत्नागिरी जिल्ह्यात पहिले ते चौथी पर्यंतचे वर्ग शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची संमत्ती असेल तर सुरु करु शकतात: शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर


 रत्नागिरी जिल्ह्यात पहिले ते चौथी पर्यंतचे वर्ग शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची संमत्ती असेल तर सुरु करु शकतात: शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर

रत्नागिरी प्रतिनिधी:-

दिनांक ४ ऑक्टोबर पासून शासनाच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. तसेच ज्या गावांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची संमत्ती असेल तर पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करु शकतात. अशी माहीती रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण व वित्त समिती सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी दिली आहे. 

निसर्ग चक्रिवादळ तसेच तौक्ते वादळ यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची खुप मोठी पडझड झाली. त्यानंतर काही कोटींचा निधीची आवश्यकता भासली. मात्र निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता कुठे बसवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीदेखील शासनस्तरावर आमचा निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या विद्यार्थांचे वर्ग सुरु करण्यासाठी स्थानिक स्तरावर नियोजन चांगल्या प्रकारे सुरु आहेत. प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुयोग्य नियोजन करत आहेत. गणवेश वाटपाचे नियोजन देखील पंचायत समिती स्तरावर केले जाणार आहे. शाळांमध्ये येणा-या विद्यार्थ्यांचे माझ्याकडून हार्दिक स्वागत व शुभेच्छा देतो. गणवेश वाटपाचे कार्यक्रम त्या त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत केले जातील. अशी माहीती सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी दिली आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments